भुसावळ (प्रतिनिधी )-
जय गणेश फाउंडेशन पाच वर्षांपासून ‘द्वारकाई’ व्याख्यानमाला हा सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. यंदा व्याख्यानमालेचे सहावे वर्ष असून कोरोनाचे संकट गडद झाल्याने वैचारीक चळवळ प्रवाहीत राहावी म्हणून ही व्याख्यानमाला २९ ते ३१ जुलै दरम्यान ऑनलाइन घेण्यात येणार आहे
सुरभीन गरातील जय गणेश फाउंडेशनच्या कार्यालयात शुक्रवारी चार सदस्यीय कोअर कमिटीची बैठक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

पाच वर्षांपासून व्याख्यानमाला
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही व्याख्यानमाला घेतली जाते. पाच वर्षांपासून ती दरवर्षी शहरातील तीन किंवा चार शाळा, महाविद्यालयांत फिरत्या स्वरुपात घेतली जात होती. यंदा मात्र, कोरोनाच्या संकटामुळे मर्यादा आल्या होत्या. मात्र, असे असले तरी हा उपक्रम खंडित होऊ नये व वैचारीक चळवळ प्रवाहीत राहावी म्हणून यंदाची ‘द्वारकाई’ व्याख्यानमाला झुम अॅप, वेबीनार, फेसबुक अशा विविध ऑनलाइन माध्यमांचा वापर करून घेण्याचे निश्चित करण्यात आले. द्वारकाई ऑनलाईन व्याख्यानमाला कोअर कमिटीत माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक तथा रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण मांंडाळकर, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत वक्त्यांची नावे निश्चित करण्यात येतील. फाउंडेशनच्या कार्यालयात या उपक्रमासाठी खास ‘व्हर्च्युअल’ कक्ष तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.


