भुसावळ (प्रतिनिधी ) –
सध्याच्या कोविड प्रादुर्भाव च्या काळात विद्यार्थी घरातच बसून आहेत व ऑनलाईन शिक्षण सुरू असून यामध्ये पालक व विद्यार्थी यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली यांच्यावतीने दोन दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमाले हे आयोजन करण्यात आले असून वक्ते संवाद साधणार आहेत
शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षक-पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यानमाले तून वक्ते आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवार सायंकाळी सहा वाजता विद्यार्थी पालक शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये हे घरातील वातावरण तणावमुक्त व आनंदी ठेवण्यासाठी शनिवारी प्रथम पुष्प रंग माझा वेगळा या मालिकेतील अभिनेते तथा मन:शक्ती केंद्र लोणावळा येथील साधक डॉ संजीवकुमार पाटील कोरोना महामारी शिक्षणाच्या परिस्थितीत विद्यार्थी शिक्षक पालक यांची मनस्थिती या विषयावरती संवाद साधणार असून रविवारी दुसरे पुष्प रोटरीचे नेत्ररोग तज्ञ डॉ. आनंद अशोक झुनझुनवाला हे स्मार्टफोन टीव्ही व ऑनलाईन क्लासच्या प्रभावाखाली विद्यार्थ्यांची दृष्टी या विषयावरती संवाद साधणार आहे सदर व्याख्यानमाला झूम ॲप व रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली च्या फेसबुक पेज वरून लाईव्ह करण्यात येणार आहे या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली चे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे जॉईन सेक्रेटरी संजय भटकर सदस्य योगेश इंगळे सुनील वानखेडे प्रदीप सोनवणे जीवन महाजन यांनी केले आहे



