भुसावळ (प्रतिनिधी )- नवीदिल्ली येथे राज्यसभेत झालेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीच्या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जयहिंद,जय महाराष्ट्र,जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष केल्याबद्दल त्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी रागाने समज दिली व ही घोषणा रेकॉर्ड वरून काढण्यात येईल अशा पध्दतीची समज दिल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे व सर्व समाजाचे मन दुखावले गेले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराज यांचा अपमान केला याचा भुसावळ शहर काँग्रेस कमिटी तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.उपराष्टृपतींनी देशासमोर आपली दिलगिरी व्यक्त करावी असे निवेदन शहराध्यक्ष रविंद्र निकम,मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे,सरचिटणीस शैलेश अहिरे, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, रविंद्र साळवे,विलास खरात, विनोद पवार,सुरेश महाजन सागर कुरेशी,छोटु टेलर,सचिन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी दिले.



