भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील खडका येथील मुस्लीम काॅलनी वार्ड क्र.२ मध्ये जिल्हा क्रिडा अधिकारी अखत्यारीत ८ लाख रू.मंजूर निधीने व्यायाम शाळेचे भूमीपूजन इस्लामी पध्दतीने गरीब नवाज मशिदीचे इमाम मौलाना जिलानी यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी मा.सरपंच रईस खान लोधी,रफीक पटेल,दानिश खान, ज्ञानेश्वर आमले,अफसर खान, पप्पू खान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या व्यायाम शाळेचे लवकरच काम सुरू होणार असल्याने या परिसरातील तरूणांनी आनंद व्यक्त केले आहे.



