भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील खडका रोड भागातील एक्सेल हाॅस्पीटल तर्फ़े हाॅस्पीटलसह रजा टाॅवर व अमरदिप टाॅकिज चौकात आज दि.२३ जुलै गुरूवार रोजी शहर व परिसरातील शेकडो नागरिकांना कोव्हीड १९(कोरोना)संसर्गापासुन बचावासाठी मालेगाव पॅटर्न काढा तयार करून मोफत वाटण्यात आला.या युनानी काढ्याने खोकला,सर्दी व अन्य आजारावर नियंत्रण मिळवता येते असे एक्सेल हाॅस्पीटलचे प्रमुख डाॅ.एजाज खान यांनी सांगितले.यावेळी युनूस मामा शेख,मुजाहीद शेख,नदीम अरब,अशरफ तडवी,निसार खान,अकबर गवली,नजर शेख,कलीम शेख उपस्थित होते.



