जळगाव –
जिल्ह्यात बुधवारी तब्बल 418 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 8605 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून कोरोनामुळे आतापर्यंत 427 रुग्णांचे मृत्यू ओढवले आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 121,जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 29, अमळनेर 15, चोपडा 45 ,
पाचोरा 18 ,भडगाव 02 ,
धरणगाव 25 ,यावल 16 ,एरंडोल 10 ,जामनेर 38 ,रावेर 33 , पारोळा 05 , चाळीसगाव 44 ,
मुक्ताईनगर 02 ,बोदवड 03 ,
अन्य जिल्हा 00 .
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८६०५ इतकी झाली आहे.आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.



