भुसावळ( प्रतिनिधी )-

कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असून घरी बसलेल्या विद्यार्थी पालकांसाठी रोटरी ताप्ती व्हॅली तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी ऑनलाइन मिटींगचे आयोजन बुधवारी सायंकाळी करण्यात आले आहे
कोरोना सदृश्य परिस्थितीत शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी रोटरी ताप्ती व्हॅली यांच्यातर्फे प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन प्रत्येक प्रत्यक्ष शनिवार व रविवारी होणार आहे या माध्यमातून संवेदनशील विषयावरती व्याख्याते बोलणार असून भीती पळवून आनंदमय जीवन जगण्यासाठी या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिक्षक विद्यार्थी व पालक यांना व्हावा यासाठी बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी समाजसेवक यांची ऑनलाईन झूम मीटिंग आयोजित केली असून या प्रबोधन पर कार्यक्रमाच्या हेतू उद्दिष्ट सांगण्यासाठी ताप्ती व्हॅलीचे प्रेसिडेंट सुधाकर सनान्से जॉईंट सेक्रेटरी संजय भटकर संवाद साधणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहेत


