भुसावळ (प्रतिनिधी)-
शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना ९ रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आतापर्यंत गावठी कट्टयासह नऊ आरोपी ताब्यात घेण्यात आले होते.
१५ रोजी रात्रीच्या सुमारास या गुन्ह्यात संशयीत आरोपीसह दुसरा गावठी कट्टा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे .
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड तसेच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी यांच्या पथकाने येथील ध्यान केंद्रा जवळ अजून एका संशयित आरोपी सुरेश सपकाळे याचेकडून आरोपीच्या घराच्या पाठीमागे ठेवलेला एक गावठी कट्टा ५ हजार रुपये किंमतीचा १५ रोजी रात्री हस्तगत करून आरोपी सह गावठी कट्टा शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या गोळीबार प्रकरणातील दोन गावठी कट्टयासह संशयित आरोपी सुरेश सपकाळे
पोलीसांनी ताब्यात घेतले.



