भुसावळ (प्रतिनिधी )-
पोदार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता १० वी.सी.बी.एस ई.अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.
शाळेतून चेतन राजीव भावसार या विद्यार्थ्यांनी ९७.४ %
घेऊन प्रथम क्रमांक पटकविला,९५.८ % घेऊन द्वितीय क्रमांकाव कशिश नवीन अग्रवाल, ९५.४ % अथर्व अनिल संगवारने प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला , समर्थ चंदनकुमार पाटील ९५.०० %.तसेच अनंत त्रिपाठी ९४.२ %, श्रेया संजय जांभूलकर ९४ %, अर्णव प्रशांत अग्रवाल ,शीफा खान ९३.८ %, ओजास्विनी राजेश्वर पाटील ९२.८ %,रिया ओमप्रकाश फिरके ९२.६ %, आदर्श उपेंद्र रथ ९१.२ %
या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले.
निकालाचे वैशिष्ट म्हणजे शाळेतील सुमारे ऐंशी टक्के पेक्षा जास्त विद्यार्थांनी ७५ % हून अधिक टक्केवारी प्राप्त केली. संस्कृत विषयात चेतन भावसार, गणितात समर्थ पाटील,तर संगणक विषयात अनंत त्रिपाठी, कशिश अग्रवाल,शीफा खान या विद्यार्थ्यांनी १०० गुणांपैकी १०० गुण प्राप्त केले.
पालकांचे सहयोग, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन विदयार्थांच्या अथक परिश्रमातून प्राप्त यशाबद्दल पोदार शाळेची व्यवस्थापन समिती,
शाळेचे प्राचार्य विनयकुमार उपाध्याय,शाळेचे व्यवस्थापक
.रामदास कुलकर्णी, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका मनीषा श्रृंगी, तसेच शिक्षकगण नीलम अग्रवाल, एस्तर विन्सिंट, वंदना नाईक, अनिता जोशी, अरुंधती पाटील, लक्ष्मी रथ, रेखा मुळे, सोनिया तिवारी, माधुरी बाविस्कर, जितेंद्र वाघमारे, जितेंद्र लोखंडे, प्रकाश दलाल, रमेश धाकपाडे यांनी अभिनंदन व त्यांचे कौतुक केले आणि त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .



