भुसावळ (प्रतिनिधी )-
देशभरात कोरोना आजारामुळे केंद्र सरकारने २२ मार्च रोजी लाॅकडाऊन करून सर्वधर्मिय धार्मिक स्थळावरील प्रार्थना बंद केली होती.
मात्र आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असून आता धार्मिक स्थळांनाही नियमावली ठरवून देत सर्व धर्मिय धार्मिक स्थळांना सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी त्यात सोशल डिस्टंटींगसह मास्कचा वापर,सॅनीटायझर हे सर्व नियम पाळण्यात येतील अशी मागणी माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू यांच्यासह धर्मगुरूंनी प्रांत रामसिंग सुलाने यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी धर्मगुरू मौलाना अ.हकीम,मौलाना गुलाम सरवर,हाफीज कमरूद्दीन,हाफीज रेहान रजा,हाफीज गुलाम जिलानी,हाफीज सुलतान,हाफीज रईस,हाफीज अखलाख,शेख नजीर,शेख मुश्ताक मुसा आदी उपस्थित होते.



