भुसावळ भाजप नगरसेवक विकासकामांसाठी किडणी विकणार!


भुसावळ (प्रतिनिधी ) –
नगरपरिषदेच्‍या २०१६ मध्‍ये झालेल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना दिलेल्‍या वचननाम्‍यानुसार प्रभागातील कामे नगरसेवकांना करावयाची होती.मात्र कामे होत नसल्‍याने किडणी विकुन कामे करण्‍याचा निर्धार प्रभाग क्र.२० मधील भाजप नगरसेवक महेंद्रसिंग(पिंटू)ठाकूर यांनी केला आहे.

गेल्‍या चार वर्षांपासुन प्रभागातील नागरिकांना शुध्‍द पाणी व रस्‍त्‍यांसाठी नगरपरिषद प्रशासन व नगराध्‍यक्षांशी वारंवार चर्चा,लेखी निवेदन देऊन विषय सभेतही मांडले.तरीही विषय सर्वसाधारण सभेच्‍या अजेंड्‍यावर घेतले नाही. नगरपरिषदेची सभा घेण्‍यास प्रशासन व नगराध्‍यक्ष टाळाटाळ करीत आहे.रस्‍त्‍यांसाठी आलेला शासनाकडील निधी परत गेला आहे.नगराध्‍यक्षांच्‍या निष्‍क्रियतेमुळे जनतेच्‍या कामांसाठी आलेला निधी परत जात आहे.नियोजन शुन्‍य कारभार असून कुठल्‍याही प्रश्‍नांची दखल घेतली जात नसल्‍याने मी माझी किडणी विकून प्रभागातील डांबरी,ट्रीमीक्‍स काॅन्‍क्रिट ,पेव्‍
हर ब्‍लाॅक रस्‍ते व शुध्‍द पाण्‍यासाठी विविध ठिकाणी आरओ प्‍लॅन्‍ट लावुन जनतेला शुध्‍द पाणी देण्‍याचा प्रयत्‍न राहील.माझ्‍या प्रभागात ही कामे जो कामे करून देईल त्‍या मोबदल्‍यात मी एक किडणी देण्‍यास तयार असून गरजूंनी संपर्क साधावा असे सरळ आवाहन नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी पत्रकान्‍वये करून सत्ताधा-यांना घरचा आहेर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *