भुसावळ ( प्रतिनिधी )-
रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा दिनांक ६ रोजी उत्साहात पार पडला.
ऑनलाईन माध्यमांद्वारे पार पडलेल्या ह्या सोहळ्याचा आगळाच थाट होता. कार्यक्रमाला रोटरीचे डिस्ट्रीक्ट 3030 चे प्रांतपाल रो.शब्बीर शाकीर ,सहाय्यक प्रांतपाल धर्मेंद्र मेंडकी,रोटरी भुसावळ चे नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर (जी आर मामा), राधेश्याम लाहोटी,डॉ.सुमन देऊळकर (एडीआरएम मध्य रेल्वे मुंबई ) मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शुक्ला,मावळते सचिव राजेंद्र फेगडे,नूतन सचिव प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी,कोषाध्यक्ष ऋषी शुक्ला आदी उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शुक्ला यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर (जी आर मामा) यांच्याकडे, तर सचिवपदाची सूत्रे राजेंद्र फेगडे यांनी नूतन सचिव प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केली. मावळत्या अध्यक्षांनी गतवर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला.नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर (जी .आर. मामा) यांनी आपल्याला हा महान कार्याचा वास पुढे चालवण्यासाठी मिळाला हे आपले भाग्य असल्याचे सांगितले,आपण भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेहि सांगितले.वृक्षारोपण,आरोग्य आणि स्वछता हया घटकांवर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रांतपाल रो.शब्बीर शाकीर यांनी नवीन कार्यकारीणीला शुभेच्छा देतांना सेवा हा रोटरीचा आत्मा असल्याचे सांगितले.त्यानंतर वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
रोटरी वर्ष २०२०-२१ ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष गजानन ठाकूर (जी आर मामा) सचिव प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी,कोषाध्यक्ष ऋषी शुक्ला, माजी अध्यक्ष डॉ.रवींद्र शुक्ला,भावी अध्यक्ष राजेंद्र फेगडे ,राजीव सहगल- मानद विशेष सचिव, आरती चौधरी – उपसचिव रुपेश जैन-उपाध्यक्ष,सतीश अग्रवाल- सार्जेन्ट अट आर्म्स, कार्यकारी मंडळ आणि सल्लागार मंडळात डॉ.नारायण आर्वीकर,डॉ. माया आर्वीकर,आशिष अग्रवाल, राजीव सहगल,राजेश अग्रवाल,सारंग चौधरी,महेश भराडे,अशोक काबरा, राजेश अग्रवाल,डॉ.सुवर्णा सोनार, राजेश जोशी ,एच एस पी राव,बी. टी.अग्रवाल,अरुण मांडळकर,दीपक अग्रवाल,हेमंत नाईक,दिलीप खंडेलवाल,विकास कात्यायनी यांचा समावेश आहे. राधेश्याम लाहोटी,मदन बोरकर, जी.आर.अय्यर हे नवीन रोटरी क्लब सदस्य म्हणून रोटरी क्लब बरोबर जोडले गेले.सुत्रसंचालन व आभार डाॕ.गिरीश कुलकर्णी यांनी मानले .



