भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल आयुध निर्माणी भुसावळ येथे एनडीए प्रेरित बीजेपी सरकार द्वारा घेतला गेलेला आयुध निर्माणी निगमिकरण निर्णय रद्द करणे व सेंट्रल ट्रेड यूनियन द्वारे निर्देशीत AIDEF, INDWF, BPMS यांच्या राष्ट्रीय स्तरावर स्थापित संयुक्त संघर्ष समिति चे आदेशानुसार सरकार द्वारे सातत्याने राबविले जाणारे कामगार विरोधी धोरणाचे विरोधात एकत्र येऊन प्रदर्शन करण्याच्या आदेशानुसार येथिल आयुध निर्माणी भुसावळ येथे कामगारांच्या वतीने उस्फुर्त प्रतिसाद देत ३ जुलै रोजी देशव्यापी विरोध दिवस जोमाने साजरा केला गेला.
सकाळी कामावर जाते वेळी सर्व कामगार सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत सरकार विरोधी प्रदर्शन करीत जोरदार घोषणाबाजी केली. या प्रसंगी लक्ष्मण वाघ, एम एस राऊत, प्रकाश कदम, नवल भिडे, किशोर चौधरी व दिनेश राजगिरे यांनी संबोधित केले सरकार कशा पध्दतीने सरकारी उद्योग-धंद्यांना नुकसान पोहचवित आहे या बाबत सविस्तर माहिती दिली.कार्यक्रम सफल करणेसाठी स्थानिक संयुक्त संघर्ष समिति द्वारे दि.१ जुलै पासुनच आंदोलनास सुरवात केली होती व त्यानुसार आज दि. ३ जुलैला सर्व निर्माणी कर्मचारी मेन गेटवर विरोध प्रदर्शन करून सरकार चे लक्ष वेधले – विशाल प्रदर्शन यशस्वी करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक संयुक्त संघर्ष समिति चे किशोर पाटील, प्रविण मोरे, एम एस राऊत, एच एस बिंद्रा,अनिल सोनवणे, के बी राजपुत, विजु साळुंखे, सूर्यभान गाढे, वानखेडे, संजय अहिरे सह सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली सच्चानंद गोधवानी, प्रकाश कदम, संयोजक दिनेश राजगिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी येत्या २० जुलै नंतर संरक्षण चे तिन्ही फेडरेशन – ४१ आयुध निर्माणी चे सुमारे ८२ हजार कर्मचारी अनिश्चित कालीन संपावर जाणार असुन त्यात शतप्रतिशत कामगार सहभागी होणार असल्याचे संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.



