पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटर सायकल ढकलत भुसावळात अनोखे आंदोलन ; जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती तर्फे प्रांताना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी)-
भाजपच्या केंद्र सरकार ने पेट्रोल व डिझेलची केलेली भरमसाठ दरवाढ मागे घेण्याबाबत गुरुवार दिनाक २ जुलै रोजी मोटर सायकल ढकलत ढकलत एक अनोखे आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला व त्याविषया संदर्भात भुसावळ शहराचे प्रांताधिकारी यांचेशी चर्चा करून निवेदन दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिप पाटिल यांच्या आदेशानुसार , तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यक्रमाचे प्रशिक्षण समन्वयक योगेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी भाजपच्या केंद्र सरकार ने पेट्रोल व डिझेलची केलेली भरमसाठ दरवाढ मागे घेण्याबाबतआज दिनाक २ जुलै रोजी मोटर सायकल ढकलत ढकलत एक अनोखे आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला व त्याविषया संदर्भात भुसावळ शहराचे प्रांताधिकारी यांचेशी चर्चा करुन निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यक्रमाचे प्रशिक्षण समन्वयक योगेंद्र पाटील, जळगांव जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी,विधान सभा क्षेत्राचे अध्यक्ष इमरान खान, अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष मा.सुनिल जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार,विजय तुरकेले, कुणाल सुरळकर, विश्वनाथ गायकवाड, सुजाता सपकाळे , मयुर साळवे यांच्यासह शिवसेनेचे तालुकाध्यक्ष समाधान महाजन यांची सुद्धा उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *