भुसावळ कोवड सेंटर मधून ६० वर्षिय वृद्ध महिला बेपत्ता ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील नवोदय विद्यालयातील कोविड सेंटर बदल ६० वर्षीय महिला गायब झाली आहे . त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील भोंगळ कारभार पुन्हा उघड्यावर आला असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील महिला जळगाव येथील रुग्णालयातून गायब होऊन तिचा मृतदेह मिळाला होता . ही घटना ताजी असताना पुन्हा कोंविड सेंटर मधून महिला गायब होण्याची घटना भुसावळ येथे घडली आहे. या प्रकारामुळे कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभार पुन्हा चव्हाटयावर आला आहे.
जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून भुसावळातील पॉझीटीव्ह अहवाल आलेली वयोवृद्धा बेपत्ता झाल्याची व काही दिवसानंतर रुग्णालयाच्या शौचालयात या वृद्धेचा मृतदेह आढळल्यानंतर राज्यभरात ही घटनेने खळबळ उडवली होती . घटना ताजी असतानाच भुसावळातील नवोदय रुग्णालयातील कोविड सेंटरमधून ६० वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार ३० रोजी सायंकाळी उघडकिस आल्याने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील साकरी फाटा परीसरातील ६० वर्षीय वृद्धेला नवोदय कोविड सेंटरमध्ये रविवारी दाखल करून कॉरंटाईन करण्यात आले होते व सोमवारी स्वॅब घेवून ते तपासणीसाठी रवाना करण्यात आले होते मात्र वृद्धा मनोरुग्ण असल्याने दोन ते तीन वेळा तिने कॉरंटाईन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेसह कर्मचार्‍यांना केल्या होत्या. सदर वृद्धेला सोमवार रोजी जळगाव येथे मानसोपचार तज्ज्ञाकडे हलवण्यात येणार होते, मात्र या वृद्धेचा मुलगाही रुग्णालयात दाखल असल्याने व त्याच्यावर उपचार सुरू असल्याने वृद्धये सोबत जाण्यासाठी कुणीही नव्हते शिवाय या वृद्धेचा दुसरा मुलगाही होमगार्ड असल्याने तो ड्यूटीवर होता म्हणून मंगळवारी आईला जळगावला नेवू असे असे सांगितले होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला होता. मंगळवारी सकाळी वृद्धेला जळगावला उपचारार्थ रवाना करणार होते , वृद्धा मनोरुग्ण असल्याचेही लक्षात आलेले होते ,
मात्र सायंकाळी वृद्धेच्या मुलाने आई बाबत विचारणा केल्यानंतर वृद्धा बेपत्ता असल्याची बाब पुढे आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. वृद्धा न आढळल्याने याबाबत पोलिसात नोंद करण्यात येणार असल्याचे समजते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *