खंडाळ्यात गावठी दारू जप्त ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील खंडाळा येथे मरीमाता मंदिरामागील शेतातून
गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी कारवाई करीत संशयीत आरोपी किशोर रमेश महाजन यास अटक केली. आरोपी किशोर महाजन याच्या ताब्यातून एक हजार ८०० रुपये किंमतीची २० लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार नितीन सपकाळे, उमेश बारी यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *