वरणगावातील राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलन ; वरणगाव भाजपाचा इशारा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भाजपा शासन काळात हतनूर येथे वरणगाव पोलिस प्रशिक्षण केंद्राला १९९९ मध्ये युती सरकारला मंजुरी मिळाली होती मात्र नंतर पोलिस प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता नसल्याची बाब पुढे आल्यानंतर राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १९ ला मान्यता मिळाली होती. त्यानंतर मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय आकसापोटी वरणगावचे मंजूर केंद्र जामखेड मतदारसंघात आमदार पळवण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवार ३० जून रोजी वरणगावात स्व.गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा लावून पूजन करून भाजपा पदाधिकार्‍यांनी निदर्शने केली. हतनूरला मंजूर राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला .
प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजपा नेते अल्लाउद्दीन सेठ, शामराव धनगर, सुनील माळी, गोलू राणे, नटराज चौधरी, रमेश पालवे, हितेश चौधरी, आकाश निमकर, संजय सोनार उपस्थित होते .
तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याहस्ते व तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले होते मात्र १९९९ नंतर राजकीय आकसा पोटी मंजूर पोलीस प्रशिक्षण केंद्राला निधी देण्यात आली नाही व असे असताना भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १३५ कोटी रुपयांचा निधी प्रशिक्षण केंद्राला ७ ऑगस्ट २०१९ ला मंजूर केला होता, असेही या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *