ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेने मांडल्या समस्या ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात असंख्य ठिकाणी चुकीची देयके: प्रा.धिरज पाटील
वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिराचे आयोजन भुसावळ महावितरण तर्फे करण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भुसावळ शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, उपशहरप्रमुख धनराज ठाकूर, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, दिव्यांगसेना तालुका प्रमुख फिरोझ तडवी, उपशहर संघटक नबी पटेल, अश्विन सोनवणे, टोपेश महाजन यांनी शिबिरात शहरातील ग्राहकांनी शिवसेनेकडे केलेल्या विविध तक्रारी मांडल्या.
लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तर काही ग्राहकांना खरोखरच अवाजवी देयक मिळाली आहेत. त्यासर्वांच्या समस्या दूर करण्यासाठी समाधान शिबिरात शिवसेनेच्या वतीने अनेक तक्रारी मांडल्या गेल्या. महावितरणचे कार्यकारी अभियंते प्रदीप घोरुडे यांनी त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले.
शहर व ग्रामीण भागात असंख्य ठिकाणी चुकीची देयके: प्रा.धिरज पाटील
भुसावळच्या शहर व ग्रामीण भागात असंख्य ठिकाणी चुकीची देयके दिली आहेत. ग्राहकांचा विरोध असल्यावर सुद्धा नवीन मीटर लावली गेली. एक वर्षापासून लावलेली नवीन मीटर अपडेशन नसल्याने दुसऱ्याच ग्राहकांची बिले प्राप्त झाली आहेत या समस्या त्वरित सोडवाव्यात. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात शिबिराचे आयोजन गरजेचे आहे. ग्राहकांना वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या/शंकांचे संपूर्ण समाधान करावे, अशी सूचना प्रा.धिरज पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *