भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून बाधित रुग्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . यामुळे शहरात अनेक भागात कटेन्मेंट झोन करण्यात आले तर काही भागातील कटेन्मेंट झोन काढून मार्ग खुले करण्यात आले आहे .बहुतेक ठिकाणी नागरिक आपली मनमानी करून कटेन्मेंट झोन स्वतः काढत असून नियमभंग करतांना आढळून आल्याने उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी शहरातील कटेन्मेंट झोनची पाहणी केली .
दरम्यान मंगळवार ३० रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी विठ्ठल मंदिर वार्डातील कटेन्मेंट झोनची पाहणी केली.यावेळी अखिल भारतीय लेवा पाटीदार समाजाचे शहर अध्यक्ष देवा वाणी, गोपनीय विभागाचे नंदकिशोर सोनवणे, सचिन पोळ उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात कोरोना पोझेटिव्ह रुग्णांची संख्या 3438 इतकी झाली आहे. मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित केले व महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आल्याच्या सूचना दिल्या.तसेच सदर लॉकडाउन रेड झोन असलेले जिल्हे, तालुके व शहरासाठी राहणार आहे असे जाहिर केले .या पार्श्वभूमीवर
प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांना लॉकडाउन वाढण्यात आल्याबद्दल काही नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे का या बाबत विचारणा केली असता असे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसल्याची माहिती त्यांनी दिली .तसेच भुसावळ तालुक्यातील कामकाज मागील सूचने प्रमाणे सुरू असल्याचेही सांगितले . नगरपरिषद कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकांदारावर कारवाई करीत आहे.तर पोलीस अधिकारी कंटेन्मेंट झोनची पाहणी करीत असून रस्त्याने बिना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करतांना दिसत आहे.



