नवी मुंबई : नवी मुंबई राष्ट्रीय खानदेश महासंघ तर्फे लग्नसराई डॉट कॉम (http://lagansarai.com) या नावाची वेबसाइट तयार करण्यात आली आहे.

लग्नसराई डॉट कॉम या वेबसाईटवर सर्व व्यक्ती लग्नायोग्य असलेल्या त्यांच्या घरातील किंवा नातेवाईक मुलगा-मुलगी यांच्या नावाची नोंद करु शकणार आहेत. लग्नसराई डॉट कॉम वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे. या वेबसाइटवर नाव नोंदणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही. याशिवाय लग्न इच्छुक दोघांची एकमेकांशी मोबाईल वरुन पासवर्ड देऊन जोपर्यंत कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत एकमेकाला कोणतीही खाजगी माहिती दिसणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था लग्नसराई डॉट कॉम या वेबसाईटमध्ये करण्यात आलेली आहे.
दरम्यान, लग्नायोग्य तरुण – तरुणींच्या पालकांनी लग्नसराई डॉट कॉम या वेबसाईटचा पूरेपुर फायदा घ्यावा तसेच लग्नसराई डॉट कॉम या वेबसाईट बाबत काही सूचना असतील तर नक्की संपर्क करावा, असे आवाहन लग्नसराई डॉट कॉम या वेबसाईट तर्फे नवी मुंबईतील सर्व बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.


