वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र कायम ठेवावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम संपन्न ; अभियानास प्रचंड प्रतिसाद ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र वरणगाव येथेच कायम ठेवावे या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने भुसावळ शिवसेनेतर्फे दिनांक २८ जून २०२० रोजी वरणगाव येथील बस स्टँड चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
प्रसंगी मोहिमेची सुरुवात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यां प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आली. स्वाक्षरी अभियानासाठी वरणगाव सह परिसरातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठल्याही परिस्थितीत स्थलांतरीत करण्यात येऊ नये अशी सर्वांची मागणी आहे. सदर मोहिमेअंतर्गत घेतलेला स्वाक्षऱ्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्द करून त्या माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पर्यंत पालकमंत्री महोदयांच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे तसेच त्याबाबतचे निवेदन २९ सोमवार रोजी देण्यात येणार आहे.
स्वाक्षरी अभियान यशस्वीतेसाठी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, सुनील कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, नीळकंठ सरोदे, शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत पाटील, वसंत नेहेते, उपतालुका संघटक प्रकाश कोळी, गण प्रमुख किशोर कोळी, युवा सेनेचे रमेश धरणे यांनी परिश्रम घेतले. तसेच निलेश ठाकूर, निलेश सुरडकर, कैलास पाटील, राहुल बावणे, दीपक पाटील, दीपकसिंग पाटील, सागर वंजारी, पंकज पाटील, भूषण बाविस्कर, सागर वाघ, सागर लोंढे, सुदर्शन जाधव, कृष्णा पाटील नितीन पाटील, कृष्णा पुजारी, दिपक माळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *