भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील गजराज फाऊंडेशनच्या माध्यमातून सलून व्यावसायिकांच्या मदतीकरीता व सुरक्षितते करीता शहरातील गणेश काॅलनी,भिरूड काॅलनी,भोई नगर,अयोध्या नगर , परिसरात नाभिक समाज बांधवांना सुरक्षा किट्स चे वितरण रविवार २८ जून रोजी येथील गजराज फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले .
सलुन व्यवसाय तीन महिने पूर्ण पणे बंद असल्यामुळे व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची बिकट परिस्थिती ओढावली आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता लॉकडाउन सुरु आहे त्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव फैलण्याची भिती ही सलून व्यवसायिकाला जास्त आहे. यामुळे व्यवसाय बंदच होते .याचा विपरीत परिणाम होऊ लागला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड़ झाल्याने अनेकांनी आत्महत्या
केल्याच्या घटना घडत होत्या त्यासाठी शासनाने अटी व शर्थीवर सलून व्यवसाय सुरू करण्यास २८ जुन पासून परवानगी दिली .यामुळे सलून व्यावसायिकांनी शासनाचे समाधान व्यक्त केले .
सलून व्यवसाय सुरू होताच नागरिकांची दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार त्यापासून मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव फैलण्याची भिती ही सलून व्यवसायात जास्त आहे. याकरीता गजराज फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष विशाल प्रल्हाद ठोके यानी रविवार रोजी सलून व्यवसायिक यांना सँनीटायझर व कीटचे वाटप केले वाटप केले. यावेळी गजराज फाऊंडेशन चे सहकारी विजय भालेराव,तुषार लाम्हणे,प्रकाश पवार आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .



