भुसावळ (प्रतिनिधी ) –
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व नागरिकांवर व्यवस्थित उपचार व्हावे म्हणून रेल्वे प्रशासन आणि राज्यशासनाकडून हॉस्पिटलला दिनांक ४ मे २०२० पासून कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आले .
रेल्वे आणि राज्यशासन यांच्या समन्वयामधून शहरातील आणि बाहेरील रुग्ण यांचेवर उपचार केले जात आहे .
रेलवे डॉक्टर , नर्स , वार्ड बॉय , आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि विभाग हे सातत्याने रुग्णांवर बारीक लक्ष ठेऊन काळजी घेत आहेत . या हॉस्पिटल मध्ये कोरोना वॉर्ड मध्ये एकूण ६४ बेड हे आरक्षित करण्यात आले आहे . जेणे करून उपचारार्थ कुठलीही असुविधा होणार नाही .
आता पर्यंत रुग्णालयामध्ये ८० कोरोनाबाधित रुग्नांवर यशस्वीपणे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे . घरी सोडण्यात आलेल्या रुग्णामध्ये एक ९० वर्षाचे वृद्ध आणि १५ पोलीस कर्मचारी यांचाही समावेश आहे.
घरी सोडण्यात आलेले रुग्णानी सांगितले कि हॉस्पिटलमध्ये आम्हाला चांगली सेवा आणि चांगले उपचार मिळाले . ९० वर्षाच्या वृद्धाने कोविड आजारास चांगलीच झुंज दिली बरे झाल्यावर त्यांना दिनांक ३ जून रोजी मुक्त करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी रेल्वे हॉस्पिटल आणि तिथल्या स्टाफ बद्दल आपले मनोगत व्यक्त केले होते त्यांनी सांगितले कि रेल्वे हॉस्पिटल चे डॉक्टर , नर्स व इतर स्टाफ यांनी माझ्यावर तातडीने उपचार केले .तसेच त्यांचा तर्फे मला चांगली सेवा देण्यात आली , हॉस्पिटल मध्ये स्वछता चांगल्या प्रकारची होती व कोरोना संसर्गाचा उपचार दरम्यान सर्व नियमाचे योग्य पालन करण्यात आले होते . यामध्ये सर्व उपचार घेत असलेले सर्व रुग्ण हे सुखरूप आणि आनंदी आहे . कोरोनाच्या काळात कठीण प्रसंगी रेल्वे हॉस्पिटल मधील डॉक्टर , नर्स , वॉर्ड बॉय , आणि सर्व विभागातील कर्मचारी हे एक कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत . म्हणून हे रेल्वे हॉस्पिटल रुग्णासाठी संजीवनी ठरत आहे .



