भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागात फिरणाऱ्या
एका संशयीत आरोपीस गावठी कट्ट्यासह शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या आरोपी विरुद्ध आरोपीविरूद्ध यापूर्वीदेखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागात गुरुवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास
एक संशयीत गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरीत कारवाई करीत विनोद लक्ष्मण चावरीया 40, वाल्मीक नगर, भुसावळ यास ताब्यात घेतले
आरोपी विनोद चावरीया याची अंग झडतीत घेतली असता 10 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध जुबेर शेख यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली साहील तडवी, संजय बडगुजर, सुनील सैंदाणे, जितेंद्र सोनवणे, जुबेर शेख आदींच्या पथकाने केली.



