बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे शोध पथकाच्या ताब्यात ;


भुसावळ ( प्रतिनिधी )-
येथील आठवडे बाजारात ओटयावर बसलेल्यां व्यापाऱ्यास सिगारेट मागण्याच्या कारणावरुन बंदूकिचा धाक दाखवून मोबाइल हिसकावून नेणाऱ्या दोघां अट्टल गुन्हेगारांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मंगळवार रोजी शहरातील घोडेपीर बाबा भाग परिसरातून पकडून ताब्यात घेतले .
सोमवार रोजी रात्री ९ वाजे दरम्यान गुन्ह्यातील फिर्यादी राजेश रमाशंकर दुबे रा.शनिमंदिर वॉर्ड भुसावळ हे दिनांक 21 सोमवार रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास त्याचे भाऊ संतोष दुबे व राहुल चौधरी सोबत आठवडे बाजारात मध्ये सिमेंट ओटयावर बसलेले असतांना आरोपी बाबा काल्या व रईस याच्या सोबत दोन इसम अशानी फिर्यादिस सिगारेट मागितली व त्याच वेळेस बाबा काल्या याने त्याच्या कमरेतून पिस्तुल काढून फिर्यादिस पिस्तूलचा धाक दाखवला व त्याच्या मित्रांनी फिर्यादीचा 15 हजार रुपये कीमतीचा सॅमसंग कंपनीचा S8 मोबाईल जबरीने हिसकावून नेला तसेच शिवीगाळ व धमकी दिल्यावरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात भाग 5 गुरन 0667/2020 भा द वि कलम-394,323, 504,506,34 आर्म ऍक्ट कलम-3/25 प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे.
दरम्यान गुन्ह्यातील आरोपी आशिक उर्फ बाबा काल्या असलम बेग वय-22 रा.अयान कॉलनी भुसावळ आणि शेख रहीस शेख नईम वय-19 रा.पंचशील नगर भुसावळ हे दोघे गुन्हा घडल्या पासून फरार होते .
घोडेपीर बाबा परिसरात हे दोघे असल्याची गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्यावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले .
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके , तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली सहायक्क पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, पोलीस नाईक ,किशोर महाजन, समाधान पाटील, रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, पोकॉ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देखमुख, प्रशांत परदेशी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *