राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भुसावळ आणि निमा तर्फे भुसावळरांसाठी रूग्ण सेवा केंद्र सुरु करण्याचे नियोजन ;


भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आपला भारत देशसुद्धा यातून सुटलेला नाही. महाराष्ट्रात याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत असला तरी मुंबई पुण्यानंतर आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त प्रभाव हा असावळ शहराला जाणवायला लागला आहे. माणूसकी संपवणाऱ्या या आजाराला बऱ्याच अंशी वैद्यकीय सेवा तोकडी पडायला लागली आहे . त्यात वातावरण बदलल्यामुळे भुसावळ शहरातील नागरिकांना लहान सहान आजार जसे सर्दी ,पडसे ,खोकला, ताप , जुलाब , ऍसिडिटी ,यासारख्या आजारांवर उपचार करणे अवघड झाले आहे ही बाब लक्षात घेऊन भुसावळ करांच्या सेवेत दिनांक ८ जून सोमवार पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा आपत्ती विमोचन समिती व निमा ( नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ) यांच्या संयुक्त विद्यमानाने भुसावळ येथे दोन ठिकाणी रुग्ण सेवा केंद्राची सुरुवात होत आहे . अतिशय माफक दरात दवाखान्यात दुपारी ३ ते ७ या वेळेत रूणांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या
दवाखान्यांमध्ये साथीच्या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व काळजी तपासणी करतांना
केली जाणार आहे.
तपासणी पूर्ण नोंदणी थर्मल स्क्रीनिंग द्वारे ताप चेक करणे, पल्स ,ऑक्सी मीटरने शरीरातील ऑक्सीजन लेव्हल , चेक करणे ,आणि इलेक्ट्रॉनिक बीपी मशीन द्वारा इन प्रेशर चेक करणे या सुविधा सुद्धा उपलब्ध राहतील तसेच रुग्णाच्या आजाराचे स्वरुप पाहून आवश्यकतेनुसार योग्य कन्सल्टंट करून इलाज केला जाईल वा पुढील उपचार सल्ला दिला जाईल. सदर रुग्णालय हे संतोषी माता हॉल प्रोफेसर कॉलनी मातृभूमी चौक व श्री गुरुनानक बडा सेवा मंडळ संत कंवरराम चौक सिंधी कॉलनी भुसावळ येथे सुरु करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी भुसावळ शहर संघचालक डॉ . वीरेद्र झांबरे 9823152558 निमा सथित डॉ. अंकित चौधरी BH3D142742 भुसावळ शहर कार्यवाह हर्षल सपकाळे 9665520978, सहकार्यवाह प्रविण नायसे 9970738709 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भुसाळ जिल्हा प्रचार प्रमुख प्रशांत वैष्णव यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *