भुसावळ (प्रतिनिधी )-
ना गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरात युवासेना तालुका व शहर यांचे तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भुसावळ शहरात व तालुक्यात पुन्हा एक वेळा युवासेनेच्या माध्यमातुन घेतलेल्या या रक्तदान शिबिरात ८० टक्के समाजकारण २० टक्के यानुसार कार्य करून रक्तदान केलेल्या मुलांनी माणुसकीचा संदेश भुसावळ तालुक्याला दिला आहे . हे शिबिर युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा व शिवसेना शहरप्रमुख बबलु ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख हेमंत ब-हाटे शहरप्रमुख सुरज पाटील यांनी आयोजित केले होते तरी हे शिबिर यशस्वीतेसाठी अँड निर्मल दायमा उपतालुका प्रमुख पप्पुभैय्या बारसे ,शिवसेना तालुका संघटक धीरज पाटील, उपशहरप्रमुख धनराज ठाकुर , युवासेना उपतालुकाप्रमुख पवन बाक्से, विशाल कोतवाल शहरचिटनीस मयूर जाधव ,उपशहरप्रमुख विकास पाटील ,उपशहरप्रमुख शरीफ तडवी ,कंडारी गांवचे सुरेंद्र सोनवणे, कु-हा पानाचे सचिन सोनार ,प्रदुम्न्न पाटील ,योगेश काळे ,गिरीश जंजाळकर ,उदय गोसावी साजिद शेख ,मो.रेहान ,आदिसह युवासेनेच्या शिवसैनिकांनी परिश्रम घेतले .
जनतेच्या समस्या सोडवण्यास युवासेना कटिबद्ध – हेमंत ब-हाटे
तालुक्यात व शहरात युवासेना नेहमी कोणत्याही अडचणी च्या वेळी सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहील असा ठाम विश्वास युवासेना तालुकाप्रमुख हेमंत ब-हाटे यांनी यावेळी व्यक्त केला .



