डॉक्टरांकडे घरफोडी,दोघांना एलसीबीने केली अटक

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील खडका रोड भागातील कोरोना बाधित डॉक्टर दाम्पत्याच्या घरातून चोरट्यांनी रोकडसह १० लाख ९० हजार ९०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ही घरफोडी उघडकीस आणली असून एका आरोपीला अटक केली असून एका आरोपीच्या वडिलांनाही ताब्यात घेतले आहे. दोघा संशयीतांच्या ताब्यातून २ लाख ८६ हजार ४०० रु.रोख जप्त करण्यात आले आहे.
घोडे पीर बाबा भागातील आकाश सुरेश मोरे ( वय २५) या आरोपीला यात ताब्‍यात घेण्‍यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच २ लाख ८६ हजार ४०० रुपये रोख तर दुसरा संशयीत आरोपी दाऊदचे वडील शेख महेबूब शेख इमाम (वय ६०)रा.दिनदयाळ नगर यांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ७९ हजार ९०० रुपये रोख जप्त करण्यात आले. दोघा आरोपींना तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, भुसावळ बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय.राजेंद्र का.पाटील,पोहेकाॅ.अनिल इंगळे, रमेश चौधरी,युनूस शेख,संतोष मायकल,रणजीत जाधव,राजेंद्र पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *