एक पाऊल कर्तव्याचे ; पोलिस बांधवांसह त्यांच्या परिवारास मोफत अर्सनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता पोलिस बांधव आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहे .आपले कर्तव्य व सेवा बजावतांना एका पोलिस बांधवाचा मृत्यु झाला तर सुमारे ११ पोलिस बांधव बाधित झाले असून उपचार घेत आहेत . याकरीता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या परिवाराच्या आरोग्याची काळजी व खबरदारीची येथील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृऊबा समिती सभापती सचिन संतोष चौधरी यांनी त्वरीत दखल घेत रोग प्रतिकारशक्ति वाढण्याकरीता भुसावळातील सर्व पोलिसांना मोफत अर्सनिक अल्बम 30 या आयुर्वेदिक गोळ्यांचे (औषध) वाटप केले .
सचिन चौधरी यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन , पोलीस लाईन मध्ये पोलिसांचे परिवारास घरोघरी तसेच रस्त्यावर ड्यूटी करणारे वाहतूक पोलिस यांना मोफत अर्सनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप केले . या स्तुत्य उपक्रमाचे पोलिसांसह त्यांच्या परिवाराने कौतुक करीत आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *