भुसावळ पालिकेने नगरपालिका संकुलाचे भाडे माफ करावे – डॉ.नि.तु.पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चार टप्प्यात लॉकडाउन वाढवण्यात आल्याने केंद्रासह राज्य शासनाचे आदेश पाळत शहरातील सर्व लहान , मोठे व्यापारी बांधवांनीदेखील आपापली दुकाने बंद ठेवत यात सहभाग नोंदवला होता त्यामुळे व्यापारी बांधव आर्थिक संकटात सापडले असून ते स्थिरस्थावर होण्याची चिन्हे नाहीत. भुसावळ नगरपरिषद संचलित सर्व जुने आणि नवीन गाळ्यांचे कमीत कमी तीन महिन्याचे भाडे माफ करावेत आणि त्यांना जगण्यासाठी नवी उमेद द्यावी, अशी मागणी डॉ.नितु पाटील यांनी उपजिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
सेलू नगरपरिषद, जिल्हा परभणी, येथील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत तेथील ७०० व्यापारी बंधूंचे चार महिन्यांचे गाळे भाडे माफ केले आहे. तेव्हा अ वर्ग भुसावळ नगरपरिषदेने देखील असाच निर्णय लवकर जनहितार्थ घ्यावा, अशीही विनंती डॉ.पाटील यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *