तळवेलमध्ये शॉर्ट सर्किटने चार्‍याला आग ; लोंबकळणार्‍या वीज तारांमुळे अपघाताची भीती

भुसावळ (प्रतिनिधी )-
तळवेल येथील शेतकर्‍याच्या शेतातून गेलेल्या वीज तारांमध्ये घर्षण होवून आग लागल्याने शेतातील चारा जळाल्याने येथील शेतकरी संतोष सोपान शिंदे व अमोल सोपान शिंदे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जमिनीपासून सहा फुटापर्यंत लोंबळकणार्‍या वीज तारांमुळे अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वीज कंपनीने वेळीच दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान या आगीमुळे शेतातील मक्याचा चारा तसेच शेतातील दोन एकराचे ठिबक जळून नुकसान झाले. शेतकर्‍याच्या या झालेल्या नुकसानाची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील व जमलेल्या सर्व तळवेल येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *