बोदवड – (प्रतिनिधी )-
कोरोनावर भारतात विकसीत होत असलेल्या औषध संशोधनासाठी भारतातील तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून शुभम भारत चौधरी या होतकरू विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. बोदवडकरांसाठी ही बाब अभिमानास्पद ठरली आहे. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत बोदवडस्थित आई-वडिलांनी शेतीत राबून शुभमचे शिक्षण पूर्ण केले असून आज त्याने मिळवलेल्या यशा बद्दल खर्या अर्थाने शुभमच्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे शिवाय बोदवडकरांसाठीदेखील ही बाब अभिमानास्पद ठरली आहे.
एम्समध्ये रीसर्च इन्स्टिट्युटमध्ये निवड
नाईपर मोहाली येथे शिक्षण घेत असलेल्या शुभमने परीक्षा देऊन त्यात घवघवीत यश संपादन केले. त्या माध्यमातून त्याची दिल्ली येथील एम्स रीसर्च इन्स्टिट्यूटमध्ये निवड करण्यात आली. कोरोनावर विकसीत होत असलेल्या औषध संशोधनासाठी शुभमची निवड झाली आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे छत्रपती संभाजी महाराजांचे चरीत्र भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परीषदेचे इंजिचेतन तांगडे, श्रेयस भावसार, पवन चौधरी, हर्ष बडगुजर, हेमंत चौधरी, सुमित बडगुजर, शुभम चौधरी आदी उपस्थित होते



