भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून विविध विभागातील १३६ रेल्वे कर्मचारी मे महीन्यात सेवानिवृत्त
झाले. सेवानिवृत्त कर्मचारी यांचे पेंशन भुगतान आदेश व अंतिम निपटान रक्कम लाॅकडाऊन मुळे निरोप समारंभ घेऊन धनादेश न देता अंदाजीत ३६ कोटी ५७ लाख ५२ हजार ५४० रुपये त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आले आहे.या प्रयत्नात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असतांनाही कार्मिक अधिकारी,सहाय्यक कार्मिक अधिकारी व कल्याण निरिक्षकांनी व लेखा विभागाने यथस्वीतेसाठी परिश्रम घेतले.तसेच कल्याण निरीक्षकांनी पेंशन भुगतान आदेशाचे वाटप केले. वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व यशस्वी झाले.



