जनसेवक नगरसेवक पिंटू ठाकुर यांचे उल्लेखणीय कार्य ; प्रभागासह विविध शासकीय कार्यालयात फ्री हॅंड सॅनिटायझर स्टैंड बसविले ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे यावर प्रतिबंधात्मक उपाय व खबरदारी म्हणून
येथील वार्ड क्र २० चे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू )ठाकूर यांच्यातर्फे प्रभागातील नागरिकांसाठी व शहरात अहोरात्र कार्यरत आहे , फवारणी , ताप मोजने, गरीबाना अन्नदान यासह अहोरात्र सेवाव्रती ठाकुर यांनी भुसावळ नगरपालिका कार्यालय, पालिका रुग्णालय यासह प्रांताधिकारी कार्यालय , तहसील कार्यालय , बाजारपेठ पोलीस स्टेशन , अन्य ठिकाणी तसेच प्रभाग २० मधील काही भागात हॅंड सॅनिटायझर स्टैंड लावण्यात आले असून यांचे लोकार्पण २९ मे रोजी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांनी वर्दळीच्या ठिकाणी वावरतांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरीता आपले हात स्वच्छ करून काळजी घ्यावी या हेतूने विविध शासकीय कार्यालयांसह प्रभाग २० मध्ये सिंधी कॉलनी मधील झुलेलाल मंदिर, संत कवर राम चौक, बाबा तुलसीदास मंदिर, व जामनेर रोड वरील दीनदयाल नगर शाळा क्र ३५ येथील हनुमान मंदिर व जामनेर रोड वरील मस्जिद या ठिकाणी सुमारे २० टच फ्री हॅंड सॅनिटायझर स्टैंड बसविले असून नागरिकांसाठी होईल तितके सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत आहेत .याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले सदर कार्यक्रम ठिकाणी प्रा. सुनील नेवे, दिनेश नेमाडे. नगरसेवक बोधराज चौधरी, नगरसेवक अजय नागरानी, नगरसेवक गिरीश महाजन, नगरसेवक अमोल इंगळे, नगरपालिका कर्मचारी व अधिकारी तसेच गिरीश तायडे, संजय ठाकूर, अरुण धनगर,अप्पा ठाकरे जुगल ठाकूर, राहुल वरणकर, युनूस मिस्त्री, गोकुळ अहिरे प्रदीप कोळी शैलेश ठाकरे आदीं कार्यकर्ते उपस्तित होते.
या उपक्रमाचे कौतुक वार्डातील नागरिकांनी केले असून नगसेवक महेंद्रसिंग (पिंटू )ठाकूर यांना धन्यवाद देत अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *