शिवचरण उज्जैनकर यांचे लॉकडाऊन काळातील नाविन्यपूर्ण उपक्रम ;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-
येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर सर यांनी कोरोना महायुद्धजन्य परिस्थितीत लॉक डाऊनच्या या काळामध्ये विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत मुळातच उज्जैनकर हे उपक्रमशील शिक्षक असून तालुक्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक ,साहित्यिक व कला क्षेत्रात विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मुक्ताईनगर चौफुलीवर नगरपंचायत तसेच पोलीस खात्याचे असे २५ कर्मचाऱ्यांना स्वतः घरून चहापाणी, बिस्किट्स, नाश्ता घेऊन त्यांना थोडी मदत केली
त्याचप्रमाणे तीस वर्षापूर्वी जे रामायण व महाभारत दूरदर्शन वरती सुरू होते तेच रामायण-महाभारत डी डी सह्याद्री व डीडी भारती यांनी हे टीव्ही सिरियल्स या काळात पुन्हा प्रसारण केलेले होते मी ते रामायण बघून बघून १६८ पानं लिहिलीत तसेच महाभारत सुद्धा पाहून पाहून २७१ पान लिहिलेली आहेत तो एक मोठा दस्तऐवज माझा तयार झाला त्यावर पुढे पुस्तक रूपाने तो दस्तऐवज तयार करून भारतीय संस्कृती वाचन संवर्धन या नावाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याचा संकल्प आहे कारण भारतीय संस्कृती जगात महान आहे आणि रामायण आणि महाभारत हे तर जगाचे महाकाव्य आहे ना मग त्याची नवीन पिढीला त्याचे अध्यात्मिक ज्ञाना सोबतच संस्कारक्षम असणे गरजेचे आहे. तसेच उज्जैनकर यांनी त्यांच्या फाऊंडेशन’तर्फे कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये पोलीस कर्मचारी, नर्सेस ,डॉक्टर, समाजसेवक, विविध संस्था समाजसेवा करत आहेत त्यांच्यासाठी कोरोना योद्धा गौरव पत्र ऑनलाइन लिंक तयार केली आहे ती लिंक ओपन करून त्या मधील फॉर्म भरल्यानंतर लगेच आपल्या नावाचे प्रमाणपत्र त्या व्यक्तीस प्राप्त होईल कारण या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना फाउंडेशनच्यावतीने उज्जैनकर सर प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत.
उज्जैनकर सर हे नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे गेल्या २२ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत या काळामध्ये त्यांनी त्यांच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे व त्यावर ते विद्यार्थ्यांशी अधून मधून चॅटिंग करतात आणि इंग्रजी ,मराठी भाषे संदर्भातील व्याकरणाचे वरील विविध भाग व्हिडीओ क्लिप्स ,विविध व्याख्यायांचे व्याख्यान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवितात ज्या विद्यार्थ्यांकडे व्हाट्सअप मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांची फोनवर स्वतः संपर्क करून मोबाईल च्या द्वारे विषाणू संदर्भात घ्यावयाची काळजी ही विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे पालकांना सुद्धा सांगत आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे की आता या सुट्ट्यांमध्ये आपल्या घरातील जुनी वर्तमानपत्र काढून त्यातील संपादकीय ,अध्यात्मिक, साहित्यिक ,कला व क्रीडा क्षेत्रातील पुरवण्या असतात त्या पुरवण्या काढून वाचाव्यात घरामध्ये पुस्तक असतीलच त्यातील पुस्तक आपण वाचावीत असाही उज्जैनकर यांनी नुकतीच ए सी जी फिल्म प्रोडक्शन तर्फे घेण्यात आलेल्या त्यांच्या फेसबुक लाईव्ह मुलाखतीत सांगितले. अशाप्रकारे शिवचरण विजन कर्सर हे वेळोवेळी शैक्षणिक सामाजिक साहित्यिक व कलाक्षेत्रातील उपक्रम राबवत असतात या कोरोना सदृश्य स्थिती लोक डाऊन च्या काळात सुद्धा ते स्वस्थ बसलेले नाहीत तर त्यांचे कलागुण समाजासाठी वारंवार सिद्ध होते त्यांच्या या गुणांचा सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *