जोगलखेडे-भानखेडे ग्रा.पं.तर्फे मास्क व सॅनिटायझर वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील जोगलखेडे-भानखेडे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी भुसावळ तालुक्यातील जोगलखेडे-भानखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दोन्ही गावातील सर्व ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप सरपंच पंकज डिगंबर पाटील व उपसरपंच रामसिंग मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य जानकीराम कोळी, मंगला कोळी, रेखाबाई सोनवणे, ग्रामसेविका प्रतिभा तायडे, तलाठी हेमंत महाजन, पो.पा. शरद पाटील, जोगलखेडे मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे, भानखेडे मुख्याध्यापक गणेश फेगडे, उपशिक्षक सुधीर तायडे, आरोग्य सेवक देवेंद्र पाटील, अंगणवाडी सेविका निर्मला पाटील, अरुणा पाटील ,अन्नपूर्णा पाटील, आशासेविकासुरेखा कोळी, प्रतिभा जंजाळे, ग्रा.पं.कर्मचारी ठकसेन कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कोविड १९ च्या विषयी अधिक माहिती देऊन प्रतिबंधासाठी मास्क व सॅनिटायझर चा वापर तसेच अनावश्यक बाहेर न फिरणे तसेच करावयाच्या उपाय योजना विषयी माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *