शिक्षण समन्वय समितीच्या वतीने रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप

भुसावळ(प्रतिनिधी )-
तालुक्यातील शिक्षकांची कोरोना विषाणू विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी शिक्षण विभाग व शिक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज अल्बम अर्सेनिक थर्टी औषध वाटप करण्यात आले तसेच औषध घेण्याच्या पद्धती ची माहिती यावेळी सांगितले
भुसावळ तालुक्यातील शिक्षकांचा नियुक्त्या रेशनिंग दुकानावरती सोशल डिस्टन्स व जनजागृतीसाठी लावण्यात आलेले आहे शिक्षकांचा वावर गर्दी च्या जागेवर असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता भुसावळ तालुक्यातील शिक्षकांसाठी अल्बम अर्सेनिक थर्टी या गोळ्यांचे वाटप गटसाधन केंद्रात करण्यात आले सतीश पंचायत समिती व न्यायालयातील कर्मचारीदेखील या गोळ्यांचे वाटप करण्यात आले याठिकाणी तालुक्यातील केंद्रातून 1 शिक्षकांना बोलावण्यात आले होते त्यांच्यामार्फत केंद्राचा शिक्षकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे गोळ्या कशा घ्याव्यात याची माहिती गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान विस्ताराधिकारी रागिनी चव्हाण शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी दिली यावेळी ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी उमेश पाटणकर गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान पंचायत समिती कार्यालय अधीक्षक राजेंद्र फेगडे शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण विशेषज्ञ शिक्षक संजय गायकवाड रमेश दांगोडे यांच्या हस्ते गोळ्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी शिक्षण समन्वय समिती भुसावळ पदाधिकारी प्रदीप सोनवणे गजानन नारखेडे, राजेंद्र सुरवाडे, राजेंद्र ढाके,समाधान जाधव,प्रवीण मोरे,अशोक बार्हे,सुधीर तायडे, नामदेव महाजन, विजय निभोरे, विनय भोगे, अशपाक सर,अतुल पाटील,संतोष सोनवणे,संदीप पाटील,गुणवंत पाटील, रविंद्र पोळ आदी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *