भुसावळ (प्रतिनिधी )-
रद्द केलेल्या आरक्षण तिकिटाच्या परताव्यासाठी नियमात रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने आरक्षण कार्यालयाचे कामकाज दि.२२ मे पासून सुरू केले आहे. आरक्षण तिकिटाचे रद्दीकरण करण्यासाठी काही वेळापत्रक बनवण्यात आले आहे.ज्या प्रवासांचे गाडीचे आरक्षण रद्द झाले आहे. त्यांच्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. तिकीट रद्द करताना आरक्षण कार्यालयात फार गर्दी होऊ नये त्या दृष्टीने बदल करण्यात आला आहे.सदर बदल दि.२६ मे पासून लागू होईल तो पुढीलप्रमाणे राहणार आहे.
२२ मार्च ते ३१ मार्च प्रवास सुरू होण्याचे दिनांक पर्यंतच्या आरक्षण तिकीटाचा परतावा दि.२६ मे पासून मिळणार आहे.
१ एप्रिल ते १४ एप्रिल प्रवास सुरू होण्याच्या दिनांक पर्यंतचे आरक्षण तिकीट परतावे दि.१ जुन पासून मिळेल.
१५ एप्रिल ते ३० एप्रिल प्रवास सुरू होण्याची दिनांक पर्यंतचे आरक्षण तिकीटांचा परतावा ७जुन पासून मिळतील.
१ मे ते १५ मे प्रवास सुरू होण्याची दिनांक पर्यंतचे आरक्षण तिकीटांचे परतावे दिनांक १४ जुन पासून मिळेल.
१६ मे ते ३१ मे प्रवास सुरू होण्याच्या दिनांक पर्यंतच्या आरक्षण तिकीटांचा परतावा दिनांक २१ जून पासून मिळेल.
तर १ जुन ते ३० जुन प्रवास सुरू होण्याच्या दिनांक पर्यंतचे आरक्षण तिकीटांचे परतावे दिनांक २८ जुन पासून मिळणार आहे.
यात महत्त्वाचे असे आहे की, आरक्षण रद्द झालेल्या गाडीच्या तिकिटाचा परतावा प्रवासाच्या तारखेपासून १८० दिवसाच्या आत प्राप्त करू शकतील. सदर आरक्षण तिकीटाचा परतावा दि.३० जून नंतर सुध्दा मिळणार आहे. त्यामुळे तिकीट धारकांनी रद्दीकरणासाठी घाई करू नये असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे.



