सारी आजाराने मृत्‍यु,मृतदेहावर सर्वधर्मिय अंत्‍यसंस्‍कार.

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील खडका रोड भागातील ३२ खोली रस्‍ता वळणावरील आशादिप बिल्‍डींग समोर ब्राम्‍हण समाजातील दोन भाऊ राहत होते.सारीच्‍या आजाराने काल दि.२३ रोजी एकाचे निधन झाले होते.
रात्रीच त्‍यांचा मृतदेह रूग्‍णालयातुन रूग्‍णवाहीकेने घरी आणल्‍यावर संबंधितांनी घराबाहेर सोडून निघून गेले. त्यांना सारी हा आजार असल्याचे स्‍पष्‍ट झाले होते. परिसरात योग्य फवारणी आणी उपाययोजना होणे आवश्यक असतांना नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.संसर्गजन्‍य आजाराने मृत्‍यू झाल्‍याने अंत्‍यसंस्‍कार कसे करावे असा प्रश्‍न उपस्‍थित झाला होता. सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील,साजीद शेख यांनी अंत्‍यसंस्‍कारासाठी नगराध्‍यक्ष रमण भोळे व मुख्‍याधिकारी करूणा डहाळे यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांचे भ्रमणध्‍वनी बंद होते.नगरपरिषद रूग्‍णालयाच्‍या महिला वैद्‍यकिय अधिकारी डाॅॅ.किर्ती फलटणकर यांच्‍याशी संपर्क साधून कर्मचारी व शववाहिनीची मागणी केली.मात्र त्‍यांनी त्‍यास नकार दिला.पीपीई किटची मागणी त्‍यांनी मान्‍य करून २ किट उपलब्‍ध करून दिले.परिसरातील मोजक्‍या हिंदु-मुस्‍लीम बांधवांनी शेवटी मृतदेह नेत अंत्‍यसंस्‍कार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *