वरणगाव (प्रतिनिधी)-
लॉक डाऊन च्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गणिती क्रिया सोप्या करण्यासाठी ऑनलाइन स्किल डेव्हलपमेंट अंड थ्रीडी मॉडेल मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिक्षकांनी सहभाग नोंदवून ऑनलाइन गणितीय प्रतिकृती तयार केलेले आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अमूर्त कल्पना मूर्त होणार आहेत
सध्या कोरोंना वायरस मुळे लॉक डाउन आहे. सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे घरी असणार्या शिक्षकांसाठी झूम app द्वारे ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन राजकोट येथील ऑल इंडिया रामानुजन मॅथ्स क्लब, रावेर येथील डॉक्टर सी व्ही रमण व वरणगाव येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लब, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये ऑल इंडिया रामानुज मॅथ्स क्लबचे चेअरमन चंद्रमौली जोशी व हरसुल मेहुल यांनी त्रिकोण, चौकोन, अष्टकोण, वर्तुळ, शंकू, बीजगणितातील, विविध सूत्र थ्री डी मोडेल द्वारा कशा पद्धतीने सोडवता येतील तसेच शाळेमध्ये विज्ञान सारखी प्रयोगशाळा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच पीपीटी व प्रात्यक्षिक तून मॉडेल तयार करून घेतली
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे उपाध्यक्ष बी बी जोगी सचिव सुनील वानखेडे सहसचिव एस डी पाटील व सदस्यांनी परिश्रम घेतले
या कार्यशाळेला रायपूर येथून मॅथ्स गुरू इंजिनीयर बी एन राव दिल्ली येथून वैदिक मॅथ्स सोसायटीचे डॉक्टर राजेश ठाकूर नोएडा येथील डॉक्टर दीपककुमार सिन्हा जळगाव जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक बि डी धाडी यांनी देखील शिक्षकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकवण्याच्या ट्रिक्स दिल्या
विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करणे
गेल्या पंधरा वर्षांपासून ऑल इंडिया रामानुजन मॅथ्स क्लबच्यावतीने संपूर्ण भारत देशात विविध कार्यशाळा घेऊन शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करणे व थ्रीडी मोडेल तयार करण्याच्या कार्यशाळा घेतल्या परंतु पहिल्यांदाच अशा प्रकारची ऑनलाईन कार्यशाळा झाली
चंद्रमौली जोशी चेअरमन
ऑल इंडिया रामानुजन मॅथ्स क्लब राजकोट
लॉक डाऊन च्या काळात जळगाव जिल्ह्याचा हा स्तुत्य उपक्रम असून भारत सरकार नवी दिल्ली संचलित विज्ञान प्रसार विपनेट क्लबच्यावतीने विविध मॉडेल्स विकसित केलेले आहे शिक्षकांसाठी हे किट भेट देणार आहेत तसेच यापुढील विविध कार्यशाळांमध्ये जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांना सहभागी करणार आहोत
अरविंद रानडे शास्त्रज्ञ विपनेट क्लब विज्ञान प्रसार नवी दिल्ली



