हतनूरच्या आवर्तनामुळे भुसावळातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्‍न सुटणार ; आमदार संजय सावकारेंसह पालिकेनेही केला होता जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वाढत्या दूषित पाण्याच्या तक्रारी लक्षात घेता पालिका प्रशासन तसेच भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी हतनूर धरणातून आवर्तन सोडण्याबाबत जिल्हाधिकारी प्रशासनाशी पत्रव्यवहार व चर्चा केल्यानंतर एक हजार क्युसेस डे प्रमाणे मंगळवारी सायंकाळ पासून हतनूरमधून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे आवर्तन शहरात शनिवारपर्यंत पोहचून रविवार पासून अशुध्द पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हतनूर सुटलेल्या आवर्तनामुळे आगामी आठवड्यात निर्माण होऊ पाहणार्‍या संभाव्य टंचाईवरही नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे शिवाय राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी स्थानिक सत्ताधारी तसेच पालिका प्रशासनावर अशुद्ध पाण्यामुळे टिकेचे आसुड ओढले होते हेदेखील विशेष ! दरम्यान, आमदार संजय सावकारे यांनी नगराध्यक्षांनी हतनूर धरणातील आवर्तनासंदर्भात चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *