भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषानुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरु असलेल्या लॉक डाउनच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालय बंद आहे आतापर्यंत शासनाने ३ वेळा लॉक डाउन वाढवले व आता चवथ्याँदा वाढविण्याचा विचार आहे मात्र या काळात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता येथील कै.यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी,अँड बीफार्मआणी डीफ़ार्म साकेगाव-भुसावळ येथे ऑनलाइन पद्धतीने अध्यापन पूर्ण करण्यात आले यात विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासपूर्ण करण्यात आला . लॉकडाऊन मुळे विद्यार्थी घरीच आहे . त्यामुळे त्यांचे हीत लक्षात घेत त्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान न होता घर बसल्या सर्व शिक्षण मिळावे हा या उपक्रमागिल हेतु आहे . या उपक्रमात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन लेक्चर गूगल फॉर्म स्वरुपात परीक्षा , गूगल क्लासरूमच्या माध्यमाने व्हिडीओ लेक्चर , पॉवर पॉइंट पीपीटी लेक्चर , घेण्यात आले. तसेच गूगल क्लासरूमच्या माध्यमाने विविध विषयांच्या नोट्स आणि प्रैक्टिकल अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्पेशल यू ट्यूब व्हिडीओ , रिसर्च पेपर , रिवह्यू पेपर इत्यादि विद्यार्थ्यां पर्यंत पोहचविण्यात आले .सर्व प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांचे ऑडिओ व व्हिडीओच्या माध्यमाने शंकांचे निरसन केले . प्राध्यपकांनी फक्त अध्यापनच नव्हे तर टेस्ट सिरिजही ऑनलाइन पद्धतीने राबविली .सर्व विद्यार्थ्यां पर्यन्त प्रत्येक विषयांचे दोन दोन संच पोहचविण्यात आले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून या प्रश्न प्रतिसंचाची उत्तरे सोडवून घेण्यात आली . या सर्व प्रकल्पात संस्था अध्यक्ष पी. डी. सराफ, सचिव संजय इंगळे प्रा.पराग
पाटील यांचे मार्गदर्शन प्राध्यापकांना मिळाले तसेच या पुढेही काळाची गरज लक्षात घेता ऑनलाइन अध्यापनावर विशेष भर दिला जाईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष यांनी दिला असून घरी रहा व सुरक्षित रहा असे आवाहन केले आहे .



