वरणगाव (प्रतिनिधी )-
पृथ्वीची त्रिज्या आणि परिघ मोजण्याच्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण घटना म्हणजे झिरो शाडो डे म्हणजेच शून्य सावली दिवस आज राष्ट्रीय विज्ञान प्रचार व प्रसार (विपनेट क्लब) नवी दिल्ली यांच्या वतीने देशभर स्थापन केलेल्या विज्ञान क्लबच्यावतीने मापन करण्यात आले . यामध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव व रावेर येथील 2 क्लबने सहभाग नोंदवून त्यांची मापे क्लब कडे पाठवली आहे
पृथ्वीचे मोजमाप काढण्यासाठी शून्य सावली दिवशी भारत सरकार नवी दिल्लीचे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चा विज्ञान प्रसार संस्था विपनेट क्लब व पुणे येथील ज्योतिर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पृथ्वीचा परीघ मापनाचा उपक्रम आज सकाळी अकरा ते एक वाजेच्या वेळेत करण्यात आला आपण रहात असलेल्या ठिकाणची अक्षांश-रेखांश तसेच स्थानिक नून वेळ आणि काही विशिष्ट सूत्रांच्या आधारे रॉड, ग्राफ पेपर, स्पिरीट लेवल बॉटल, होकायंत्र व मोजपट्टी यांच्या साह्याने दुपारी 11 ते 1 वाजेदरम्यान विशिष्ट वेळी रोडच्या सेंटर पासून पडणाऱ्या सावलीचे मापन करण्यात आले विविध भागांमध्ये लोकल नून वेगवेगळे होते लोकल नुन या वेळेत पाच मापने घेण्यात आली देशभरात अशा 80 क्लबनेयामध्ये सहभाग घेऊन एकाचवेळी मापन केले आहे यावरून पृथ्वीचा परीघ त्रिज्या मोजण्यासाठी मदत होणार आहे .
या कार्यक्रमामध्ये रावेर येथील डॉक्टर सी व्ही रमण विपनेट क्लबचे समन्वयक संदीप पाटील व वरणगाव येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लबचे समन्वयक सुनील वानखेडे पौरस वानखेडे पार्थ वानखेडे यांनी सहभाग नोंदवून सकाळी 11 ते 1 या वेळेत सावलीचे मापन घेण्यात आले तसेच शून्य सावली दिवसाचे महत्त्व समजून घेतले
सध्या लॉक डाऊन मध्ये विपनेट क्लबच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमासाठी गेल्या पाच दिवसापासून झूम ॲप द्वारा मीटिंग सुरू होत्या या मिटिंग मध्ये तज्ञांनी साहित्याची मांडणी व मापे घेण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली होती तसेच मंगळवारी या प्रयोगाची ट्रायल घेण्यात आली होती यामधील चुकांबाबत रात्री मार्गदर्शन करून पुन्हा आज यशस्वी प्रयोग करण्यात आला
विपनेट क्लब च्या सदस्यांना शून्य सावली दिवसाच्या माध्यमातून विविध भागांमध्ये एकाच वेळी मापन करणे हा एक इतिहास होऊ शकतो तसेच या घटनेचा अनुभव देखील त्यांना आला आहे याच मापनातून पृथ्वीची त्रिज्या व परिघ अचूक काढता येणार आहे
अरविंद रानडे शास्त्रज्ञ विज्ञान प्रसार संस्था नवी दिल्ली



