भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील शिवशक्ती हुडको कॉलनी रानातील महादेव परिसर या भागात बुधवार रोजी सँनिटायझर फवारणी करण्यात आली.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी नगराध्यक्ष रमण भोळे व नगरसेवक निकी बतरा यांनी सँनिटायझर औषधीसह फवारणी मशीन उपलब्ध करून दिली. कॉलनीतील नागरिकांनी स्वतः सहभाग घेऊन फवारणी केली.यात धर्मराज देवकर व सुरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश सुभाष पाटील, दिनेश पाटील, हर्षल (गोलू) राणे, सतीश जोहरी, शुभम पाटील, आसिफ पिंजारी, चेतन (भैय्या) साळुंखे, जयेश आंबेकर, तसेच जय गजानन मंडळाचे कार्यकर्ते. यांनी परिश्रम घेतले. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन घरोघरी जाऊन केले. लवकरच कोरोनाचे महाभयंकर संकट टळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. व नगराध्यक्ष रमण भोळे व नगरसेवक निकी बतरा यांचे आभार व्यक्त केले.घरात रहा सुरक्षित रहा , असे आवाहन करण्यात आले.



