भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रेल्वे कोर्ट ते पिओएचशेड पर्यंतच्या रोड़चे काम रेल्वे प्रशासनाने सुरु केले असून हे काम रेल कामगार सेना व एनआरएमयु,एससीएसटी असोशिएशन,ओबीसी असोसिएशन या संघटनाचे पदाधिकारीच्या मागणी मुळे होत आहे.
लॉक डाउनमध्ये या रोडने येे जा करणारे रेल्वे कामगारांची संख्या कमी असल्याचे औचित्य साधुन रेल्वे प्रशासनाने रेल्वे कोर्ट ते लिम्पस क्लब एमओएच व पीओएच पर्यन्त जो रोड अक्षरशः खराब झाला होता व रेल कामगार सेनेने वारंवार डीआरएम , जीएम , नगरपालिका मुख्याधिकारी ,जिल्हाधिकारी , पालकमंत्री यांच्याकड़े या रोड संदर्भात नेहमी लिखित स्वरुपात रोड दुरुस्त करण्याची मागणी केली होती.परन्तु प्रशासन व नगरपालिका एक-दुसऱ्या कड़े बोट दाखवून चाल-ढकल करत होते.या रोडवर सर्वात जास्त त्रास रेल्वे कर्मचाऱ्यांना होत असे.या तक्रारी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना सांगाव्या लागल्यां .आता लॉक डाउन असल्यामुळे रोड़वरची वाहतूक कमीच आहे, त्यामुळे रेल्वे प्रशाासनने ज्या ठिकाणी रोड जास्त खराब आहे त्या ठिकाणी नवीन रोड बनवीने सुरुं केले आहे तर जिथे फक्त खड्डे आहेत तिथ डागडुजी करण्यात येत आहे. यासाठी रेल्वे कामगार सेनेचे मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा,सचिव राजेश लखोटे,कार्यध्यक्ष प्रितम टाक,सल्लागार प्रदीप भुसारे,विनोद वाघे, योगेश माली,रामदास आवटे, कमलाकर बनाइत,सुरेंद्र यादव,मंगेश शेलोडे,प्रकाश करसाले,राकेश पाठक,विजय तायड़े,महेंद्र सोनवणे,विजय घेंघट,नरेश शर्मा,अरविंद थोरात,एम के शाह,गोपाल बाबूराव पाटिल,वीरकुमार मंमैय्या,पंकज ठाकरे,रमेश मराठे,सूरज सागर,सजंय जगन्नाथ चौधरी व इतर सर्व पदाधिकारी यांचे शिष्टमंडळा व्यतीरीक्त एनआरएमयु,एससीएसटी एसोशिएशन,ओबीसी असोसिएशन या संघटनाचे पदाधिकारी सुद्धा पालकमंत्री यांचे कड़े निवेदन देण्यासाठी सहभाग होता



