भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन व संचारबंदी सुरु असतांना सुद्धा साकेगाव सिगरबर्डी भागात मोटर सायकलने कॅन मध्ये ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू चोरुन विक्रिस नेणाऱ्या भुसावळ येथील एकास रविवार ३ में रोजी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले . भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे स्वतः पेट्रोलिंग करीत असताना रविवारी ११ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी सुपडू सोमा भोई राहणार भोईनगर ,भुसावळ हा मोटर सायकलने साकेगाव सिगरबर्डी भागात साकेगाव रोडने मोटारसायकलवरुन ३५ लिटर कॅन मध्ये ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व मोटारसायकल सह अंदाजे २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमालसह चोरटी वाहतूक करताना मिळून आला . आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध प्रोव्ही. कायदा अन्वये आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाची अवमानता केली म्हणून भादवी कलम २७०, २७१, १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोहेकॉ संजू मोंढे, विजय पोहेकर, जगदीश भोई ,होमगार्ड सेकोकारे यांनी केली आहे.



