भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना कोविड-१९ विरुद्धच्या अखंड लढाईत मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात ४९८ टन औषध आणि वैद्यकीय उपकरणांची वाहतूक केली. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने वैद्यकीय वस्तूंची अखंड वाहतुक सुनिश्चित करीत आहे. मध्य रेल्वेने ३२३ पार्सल गाड्यांची योजना आखली असून त्यापैकी २३० वेळापत्रकानुसार पार्सल गाड्या यापूर्वीच धावल्या असून ९३ गाड्या चालवल्या जाणार आहेत. या पार्सल गाड्यांमधून ४९८ टन आवश्यक औषधे व इतर वैद्यकीय उपकरणासह ३ हजार ४२१ टनांहून अधिक आवश्यक वस्तूंची वाहतूक मध्य रेल्वेच्या भुसावळ, मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर विभागातून झाली आहे. यामध्ये १हजार३९७ टन फळ, भाज्या इत्यादी नाशवंत वस्तू, ३४ टन टपाल बॅग,२९ टन ई-कॉमर्स वस्तू इत्यादींचा समावेश असल्याचे भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले आहे.



