भुसावळात डॉ महाजन व सहकारी मिळून लॉक डाऊन मध्ये करताय मुक्या प्राण्यांची सेवा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भुसावळ शहरातील काही भागातील रस्त्ये सील करण्यात आल्याने शहरातील काही रस्त्ये निर्मनुष्य झाले आहे. रत्यावरिल दिन दुबळयां गरीब नागरिकांचे हाल होत आहे त्यात मुक़्या प्राण्याला कोन विचारते, अशी बिकट व कठीन परिस्थिती निर्माण झाली आहे याकरीता येथील डॉ भरत महाजन हे आणि त्यांचा गृप
गेल्या महिन्यापासुन शासनाच्या नियमांचे मास्क लावून ,ग्लोज घालून,सोशल डिस्टन्स चे पालन करून ,सैनीटायझर चा वापर करून नित्यनेमाने मुक्या प्राण्यांच्या (कुत्रा) जेवणाची व्यवस्था करीत आहेत.
रस्त्यावरील गोमातेला माता म्हणून प्रत्येक नागरिक काहीना काही तरी खायला देत असतो मात्र रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांचा बरेच लोक तिरस्कार करतात व हाकलून देतात , त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही ही बाब लक्षात घेऊन भुसावळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ भरत महाजन कुत्र्यांसाठी जेवणाची व्यवस्था करीत असून त्यांना खायला देवून त्यांची भूख भागवीत आहे .साईबाबा मंदिर, जामनेर रोड, नाहाटा कॉलेज , गजानन महाराज मंदिर , पेट्रोल पंप , दीनदयाल नगर , सिंधी कॉलनी , म्युनिसिपल हायस्कूल परिसर , आनंद नगर, भीरुड हॉस्पिटल, सोनिच्छा वाडी, यासह अन्य भागातील कुत्र्याना जेवनाकरिता ब्रेड, बटर, बिस्किट्स, चपाती आदीं अन्न भोजन जमा करून देत आहे . याकार्यात डॉ महाजन यांचे सोबत
जीतू पवार , विशाल टाक.पंकज कलाल, हरीश शिरसाट, पियुष माळी, रोहित महाले , कृष्णा साळी, राजू ठाकुर ,सोनू टाक, आदीं सहकारी प्रत्येक एरियामध्ये दोन-दोन सेवक याप्रमाने सोशल डिस्टन्स आणि शासनाने नियोजित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून वेगवेगळ्या भागांमध्ये मुक्या प्राण्यांना जेवणाची सेवा देत आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही मुका प्राणी उपाशी राहता कामा नये असा दृढ संकल्प डॉ महाजन आणि गोसेवा परिवार यांनी
केला आहे . तसेच जनतेला आवाहन केले की कुठे ही मुके प्राणी भुकेले किंवा जखमी ,आजारी अवस्थेत दिसल्यास डॉ. भरत महाजन व गो सेवा परिवार भुसावळ
मो. क्रमांक 8766771251
यावर संपर्क साधावा असे आवाहन गो सेवा परिवारातर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *