भुसावळ (प्रतिनिधी )-
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भुसावळ रोटरी क्लबतर्फे कोरोनाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी महत्वपूर्ण असलेले पीपीई किटचे वाटप भुसावळसह दीपनगरात करण्यात आले.
भुसावळ नगरपालिका दवाखान्यामध्ये २४ तर दीपनगर हॉस्पिटल येथे ५ तसेच डीवायएसपी कार्यालयात ५ व वरणगाव हॉस्पिटलमध्ये ५ तसेच रेल्वे हॉस्पीटलला १ कीट देण्यात आल्या .
कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव ओळखून तो रोखण्याकरीता रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० यांनी नागपूर ते नाशिक या कार्यक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर हे कीट मागवले. भुसावळ येथे असिस्टंट गव्ह.चेतन पाटील यांच्याकडे एकूण ४० कीट प्राप्त झाले होते. भुसावळातील रोटरी क्लब रेलसिटी, रोटरी मेन, ताप्ती व्हॅली, रॉयल्स यांच्या वतीने गुरूवार ३० एप्रिल रोजी त्याचे वितरण असिस्टंट गव्हर्नर रो.चेतन पाटील आणि रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.



