भुसावळ (प्रतिनिधी )-
वरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर कारवाई करावी अशी मागणी
शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली असून याबाबत निवेदन दिले आहे .
वरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी विनाकारण प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी उपोषणाचा बनाव करून कोरोनाच्या महाभयंकर परीस्थितीत नगरपरिषद समोर मांडव(टेंट) टाकून पोलीस उपनिरीक्षक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व सर्व अधिकारी वर्ग यांना वेठीस धरले होते, प्रशासनाचा महत्वाचा वेळ वाया घालवला.
सरकारी कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी पाच ते दहा टक्के कामावर उपस्थिती द्यावी असे कळवले असतांना सुद्धा विनाकारण कार्यालयात गर्दी केली जाते. अनावश्यक कामांची टेंडर काढणे, अनावश्यक ते काम सुरू करणे असे अवैध काम पालिकेत सुरू आहे. जिल्हाबंदीत अडकलेल्या अधिकाऱ्यांना हजर करा म्हणून उपोषण करण्याचा घात घातला होता. संबंधित वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोरसे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोसावी यांनी या सर्व उपद्रविंना समजून सांगितल्याने त्यांनी उपोषण स्थगित केल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितले होते.
महाराष्ट्र राज्यात तसेच जळगाव जिल्ह्याचा वरणगाव शहरात संपूर्ण लॉक डाऊन असताना देखील कलम १४४ व १८८ लागू असून देखील यांनी उपोषणाचा बनाव केला व प्रशासनाला धारेवर धरले याचा सर्वप्रथम अभिमान विकास आघाडीच्या वतीने निषेध करतो व अशा या संकट समयी शहराचे प्रथम नागरिक व त्यांचे सहकारी उपनगराध्यक्ष हे जर अशाप्रकारे प्रशासनाला धारेवर धरत असतील व विनाकारण जमाव जमवत असतील आणि स्वतःच्या फायद्यासाठी गरज नसताना संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून लोकडाउनचे उल्लंघन करण्यास भाग पाडत असतील तर आपण आमच्या या अर्जाची दखल घेऊन संबंधित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करावी व यापुढे असा बालिशपणा करणार नाहीत त्याबाबत त्यांना आपल्या स्तरावर लेखी समज द्यावी असेही नमूद केले असून
वरणगाव शहरात सरकारची बदनामी व्हावी या हेतूने वरणगावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना देखील चुकीचे नियोजन करून आठ दहा दिवस लोकांना पाण्यासाठी ताटकळत ठेवण्याचे घोर पाप वरणगाव नगरपरिषद येथील अधिकारी व कर्मचारी तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे मिळून करत आहेत. एवढ्या महाभयंकर परिस्थितीत जनतेला धीर देणे ऐवजी पाण्याचे राजकारण वरणगावात सर्रास सुरू आहे. याबाबतही आपण विचार करावा व संबंधितांना समज द्यावी तसेच वरणगाव नगरपरिषदेच्या आवारात लोक लोकडाऊनचे सर्रास उल्लंघन करून रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकडाउनचे उल्लंघन करून फोटोसेशन व साहित्य वाटप करण्यात येत होते आणि त्याच नगरपरिषदेने वरणगावात दोन दिवसाचे कडकडीत बंद जाहीर करून त्याचा स्वतःचा फज्जा उडवला. यासर्व नियमबाह्य घटनांसाठी नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील आपल्या स्तरावर योग्य कारवाई करावी. असेही निवेदनात म्हटले आहे .



